R

मिस्साबलिदानातील प्रतिसाद

प्रास्ताविक विधी

चिन्हे
[℣] धर्मगुरू  [℟] लोक  [Ⱥ] सर्वानी एकत्र

धर्मगुरू: + पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे +. लोक: आमेन.

धर्मगुरू: आपल्या प्रभू येशू खिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आल्याचा सहवास तुम्हांला लाभो. लोक: आणि तुमच्या अंतर्यामी

किंवा

धर्मगुरू: तुम्हांला कृपालाभ होवो आणि आपल्या देवपित्याकडून आणि प्रभू येशू खिस्ताकडून शांतिलाभ होवो. लोक: आणि तुमच्या अंतर्यामी

किंवा

धर्मगुरू: प्रभू तुम्हांबरोबर असो.
लोक: आणि तुमच्या अंतर्यामी

पश्‍चात्ताप विधी

धर्मगुरू: प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र रहस्ये साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊ या. लोक: सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्वदे वदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.

धर्मगुरू: सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हांवर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हांला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.

किंवा

धर्मगुरू: हेप्रभो, आम्हांवरदया कर. लोक: कारण आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.

धर्मगुरू: हे देवा, आम्हांला तुझी दया दाखव. लोक: आणि आम्हांला तुझे तारण बहाल कर.

धर्मगुरू: सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हांवर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हांला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. लोक: आमेन.

धर्मगुरू: हे प्रभो, आम्हांवर दया कर. लोक: हे प्रभो, आम्हांवर दया कर

धर्मगुरू: हे  ख्रिस्ता, आम्हांवर दया कर. लोक: हे ख्रिस्ता, आम्हांवर दया कर

धर्मगुरू: हे प्रभो, आम्हांवर दया कर. लोक: हे प्रभो  आम्हांवर दया कर

स्तुतीगीत

स्वर्गा तपरमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. हेप्रभो, परमेश्वरा, स्वर्गाच्या राजा, सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुला धन्य म्हणतो, आम्ही तुला नमन करतो आम्ही तुझा गौरव करतो, तुझ्या महान वैभवाबद्दल, आम्ही तुला धन्यवाद देतो. हेप्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या प्रसवलेल्या पुत्रा, प्रभो परमेश्वरा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तूजगाची पापे दूर करतोस, आम्हांवर दया कर; तूजगाची पापे दूर करतोस, आमची प्रार्थना स्वीकार; तू परमेश्वराच्या उजव्या हाती विराजमान झाला आहेस, आम्हांवरदया कर. कारण हेयेशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्यासह देवपित्याच्या ऐश्वर्यात तू एकमेव पवित्र, तू एकमेव प्रभू, तू एकमेव परमोच्च आहेस, आमेन.

प्रभूशब्द विधी

पहिले वाचन
दुसरे वाचन

वाचक: प्रभूचाशब्द. लोक: देवाला धन्यवाद

शुभवर्तमान

धर्मगुरू: प्रभू तुम्हांबरोबर असो. लोक: आणि तुमच्या अंतर्यामी

धर्मगुरू: (नाव) लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोक: हे प्रभो, तुझा गौरव असो.

धर्मगुरू: प्रभूचे शुभवर्तमान, लोक: हे प्रभू येशू ख्रिस्ता,तुझी स्तुती असो.

श्रद्धाप्रकटन

अ) नायसीयन श्रद्धाप्रकटन:

स्वर्ग आणि पृथ्वी / सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू / ह्यांचा उत्पन्नकर्ता / एकच परमेश्वर / सर्वशक्तिमान पिता / ह्यावर मी श्रद्धा ठेवतो / आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र / एकच प्रभू / येशू ख्रिस्त /ह्यावर मी श्रद्धा ठेवतो / तो सर्व युगांपूर्वी / पित्यापासून जन्मलेला आहे /परमेश्वरापासून परमेश्वर / प्रकाशापासून प्रकाश / खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर / तो पित्याशी एकतत्व असून / जन्मलेला आहे / उत्पन्न केलेला नाही / त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले / तो आम्हा मानवांसाठी / आणि आमच्या तारणासाठी / स्वर्गातून उतरला / आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने / कुमारी मरियेपासून / शरीर धारण केले / आणि तो मनुष्य झाला / आम्हांसाठी त्याला कुसी दिले / पोन्ती पिलाताच्या अमदानीत / त्याने दुःख भोगले / तो मरण पावला / आणि त्याला पुरण्यात आले / तो अधोलोकांत उतरला / आणि पवित्र शास्त्राप्रमाणे /तो तिसऱ्या दिवशी / पुनरूत्थत झाला / आणि स्वर्गात चढला / आणि तो पित्याच्या उजवीकडे / विराजमान झाला आहे / आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा / न्याय करण्यासाठी / तो वैभवाने पुन्हा येणार आहे / त्याच्या राज्याचा / अंत होणार नाही / जीवनाचा दाता / प्रभू पवित्र आत्मा / ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो / तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो / पिता आणि पुत्र ह्यांच्यासमवेत / त्याला भजतात / आणि गौरवितात / तो संदेष्टयांमार्फत बोलला आहे / आणि एकाच / पवित्र / कॅथलिक / व प्रेषितीय ख्रिस्तसभेवर / मी श्रद्धा ठेवतो / पापक्षमेसाठी / मी एकच बाप्तिस्मा / मान्य करतो / मेलेल्यांचे पुनरूत्थान / आणि भावी जगातील जीवन / ह्यांची मी वाट पाहतो / आमेन.

ब) प्रेषितीय श्रद्धाप्रकटन:

स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्नकर्ता / सर्वसमर्थ परमेश्वर पिता / आणि त्याचा एकुलता पुत्र / येशू ख्रिस्त / आपला प्रभू / ह्यांच्यावर मी विश्वास ठेवतो / तो पवित्र आत्म्याच्या योगाने / गर्भी संभवला / कुमारी मरियेपासून जन्मला / पोन्ती पिलाताच्या अंमलाखाली / त्याने दुःख भोगले / त्याला कुसावर खिळण्यात आले / तो मरण पावला / त्याला पुरण्यात आले / तो अधोलोकांत उतरला / तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला / स्वर्गात चढला / आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या / उजवीकडे /विराजमान झाला आहे/ तेथून तो जिवंत आणि मेलेले / ह्यांचा न्याय करण्यासाठी / पुन्हा येईल / पवित्र आत्मा / पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा / संतांचा एकोपा / पापांची क्षमा / देहाचे पुनरूत्थान / आणि सर्वकाळचे जीवन / ह्यांवर माझा विश्वास आहे / आमेन.

ख्रिस्तशरीर विधी

धर्मगुरू: बंधुभगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. लोक: प्रभूच्यानावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्तसभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो.

आभारघोष प्रार्थना:

धर्मगुरू: प्रभू तुम्हांबरोबर असो. लोक: आणि तुमच्या अंतर्यामी.

धर्मगुरू: तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. लोक: आम्ही ती लावली आहेत.

धर्मगुरू: प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानू या. लोक: ते योग्य व रास्त आहे.

धर्मगुरू: श्रद्धेचे रहस्य

(अ) हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरूत्थान जाही रकरतो.

किंवा

(ब) हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्याल्यातून प्राशन करतो, तेव्हा तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो.

किंवा

(क) हे जगाच्या तारणकर्त्या, आमचे तारण कर. तू आम्हांला तुझ्या कुसाद्वारे आणि पुनरूत्थानाद्वारे मुक्त केले आहेस.

ख्रिस्तशरीर स्वीकार विधी

धर्मगुरू: तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो:

आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हांला दे जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमाकरतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हांला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हांला सोडव.

धर्मगुरू: हे पाहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पाहा! या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. लोक: हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही; परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल.

समारोप विधी

धर्मगुरू: प्रभू तुम्हांबरोबर असो. लोक: आणि तुमच्या अंतर्यामी

धर्मगुरू: सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र + आणि पवित्र आत्मा तुम्हांला आशीर्वाद देवो. लोक: आमेन.

धर्मगुरू: जा, मिस्सा समाप्त झाली आहे. लोक: देवाला धन्यवाद

किंवा

धर्मगुरू: जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. लोक: देवाला धन्यवाद

किंवा

धर्मगुरू: तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. लोक: देवाला धन्यवाद

किंवा

धर्मगुरू: शांतीने जा. लोक: देवाला धन्यवाद