99H.FI- 3OclockPrayer
मराठी
ENGLISH

दैवी दयेचा
दुपारी ३ वाजता प्रार्थना

क्रूसाचे चिन्ह

† पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे † आमेन

तू मेलास, हे येशू, पण आत्म्यासाठी जीवनाच्या उगमचा आणि संपूर्ण जगासाठी दयेचा महासागर उघडला. हे जीवनाचा झरा, अथांग दैवी दया, संपूर्ण जगाला आणि स्वतःला आमच्यावर ओतून टाक.

हे रक्त आणि पाणी, जे आमच्यासाठी दयेचे कारंजे म्हणून येशूच्या हृदयातून अफाळून आले, मी तुझ्यावर विश्वास करते.

हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आम्हावर आणि सर्व जगावर दया कर. (3)

हे रक्त आणि पाणी, जे येशूच्या हृदयातून आमच्यासाठी दयेचा झरा म्हणून बाहेर पडले, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आमेन.

प्रभूची प्रार्थना

आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हांला दे. जशी अम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू अमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडु देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन.

नमो कृपापूर्ण मरिये (३ वेळा)

नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र  मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.

गौरव असो

पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे रुवातीला होते, आता आहे आणि पुढेही राहिल असे नसंपणारे जग. आमेन.

दैवी संरक्षण सदा आपल्यासोबत राहो, आणि देवाच्या दयेने विश्वासू आत्मियना अनंत शांती लाभो. आमेन.

क्रूसाचे चिन्ह

† पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे † आमेन