दैवी दयेचा शुद्धिस्थानातील आत्मयांसाठी चॅपलेट

शुद्धिकरणातील आत्म्यांसाठी दैवी दया चॅपलेट

(दैवी दया चॅपलेट नोवेनाच्या ८ वा दिवसापासून रुपांतरित)
चिन्हे
[℣] पुढारी  [℟] प्रतिसाद  [Ⱥ] सर्वानी एकत्र
रोझरीची माळ वापरा
क्रूसावर
क्रूसाचे चिन्ह

† पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे † आमेन

प्रेषितांचा विश्‍वासांगिकार

[Ⱥ] स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता । सर्वसमर्थ परमेश्‍वर पिता । यावर माझा विश्‍वास आहे । त्याचा एकुलता एक पुत्र । आमचा प्रभू येशू खरिस्त | यावरही माझा विश्‍वास आहे | तो पवित्र आत्म्याच्या योगाने | गर्भी संभवला । कुमारी मरियेपासून जन्मला । पोन्ती पिलाताच्या अंमलाखाली । त्याने दु:ख भोगले । त्याला क्रूसावर खिळले । तो मरण पावला । त्याला पुरले । तो अधोलोकात उतरला । तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला | स्वर्गात चढला । आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे । तेथून तो जिवंत आणि मेलेले । यांचा न्याय करावयास | पुन्हा येईल । पवित्र आत्मा | पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा । संताचा परस्पर संबंध | पापांची क्षमा । देहाचे पुनरूत्थान । आणि अनंतकाळचे जीवन | यावर माझा विश्‍वास आहे । आमेन.

आपल्याकडे असल्यास, आपल्या विशेष हेतूंचा येथे उल्लेख करा

सुरुवातीच्या मण्यांमध्ये
प्रभूची प्रार्थना

[℣] आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. [℟] आमची दररोजची भाकर आज आम्हांला दे. जशी अम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू अमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडु देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन.

नमो कृपापूर्ण मरिये (३ वेळा)

[℣] नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. [℟] हे पवित्र  मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.

गौरव असो

[℣] पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. [℟] जसे रुवातीला होते, आता आहे आणि पुढेही राहिल असे नसंपणारे जग. आमेन.

सुरूवातीची प्रार्थना

[Ⱥ] हे दयाशील येशू, तू म्हणालास की तुला दया पाहिजे. म्हणूनच तुझ्या करूणामय हृदयाजवळ शुद्धिस्थानातील आत्मे, जे तुला खूप प्रिय आहेत, त्यांना घेऊन मी येत आहे. तरीपण त्यांनी तुझ्या रास्त न्यायाची भरपाई केलीच पाहिजे. तुझ्या करूणामय हृदयातून जोराने उसळणाऱ्या रक्‍त व पाण्याच्या प्रवाहाने शुद्धिस्थानातील अग्नीच्या ज्वाला विझवून टाक. येथेसुद्धा तुझ्या दयेचे सामर्थ्य प्रकट होऊ दे. आमेन.

दशकातील मण्यांवर (५ वेळा)
सनातन पित्या

[℣] हे सनातन पित्या, आम्ही तुला तुझा अतिप्रिय पुत्र, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याचे शरीर आणि रक्त, आत्मा आणि देवीपण, [℟] आमच्या आणि अखिल जगाच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करीत आहोत.

चॅपलेट (१० वेळा)

[℣] प्रभू येशू खिस्ताच्या दु:खदायक क्लेशाद्वारे [℟] हे प्रभो, आम्हांवर व सर्व जगावर दया कर.

पवित्र देवा (३ वेळा)

[℣] हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, [℟] आम्हावर आणि सर्व जगावर दया कर.

शेवटची प्रार्थना

[℣] हे सनातन पित्या, तुझी दयादृष्टी शुद्धिस्थानातील दु:ख सहन करणाऱया आत्म्यांवर लाव. ज्यांना येशूने आपल्या कूरूणामय हृदयात सामावून घेतलेले आहे. हे प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त, ज्याचा आत्मा खडतर दु:ख सहनाने ओसंडून वाहात होता, त्या दु:ख सहनाद्वारे तुझ्याकडे विनवितो की तुझ्या न्यायी चौकशीत असलेल्या ह्या आल्म्यांवर तुझी क ृपादृष्टी वळव. तुझ्या परमप्रिय पुत्र येशूख्रिस्ताच्या  घावा पाहून त्यांच्याकडे तुझी दयाळू नजर लाव. आमची पूर्ण खात्री आहे की तुझ्या चांगुलपणाला व करूणेला काही मर्यादा नाहीत. आमेन. [℟] हे परमेश्वरा, त्यांना अनंतकाळाची विश्रांती दे आणि त्यांच्यावर चिरंतर प्रकाश पडू दे; सदैव तुझ्या संतांसह, कारण तू दयाळू आहेस.

सह सुरू ठेवा
किंवा यासह समाप्त करा

[℣] दैवी संरक्षण सदा आपल्यासोबत राहो, [℟] आणि देवाच्या दयेने विश्वासू आत्मियना अनंत शांती लाभो. आमेन.

क्रूसाचे चिन्ह

† पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे † आमेन

दैवी दयेचा शुद्धिस्थानातील आत्मयांसाठी चॅपलेट VIDEO
Play Video about दैवी दयेचा शुद्धिस्थानातील आत्मयांसाठी चॅपलेट VIDEO

लूक 6:36 वर स्तोत्राचे प्रतिबिंब  

परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर. परमेश्वरा, मला मदत कर. मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस… (स्तोत्रसंहिता 30 वरून)

Translated from English by Vineeta Bastian
विनीता बॅस्टियन यांनी इंग्रजीतून अनुवादित केले आहे